मानवी आस्तित्व - लेख सूची

मानवी अस्तित्व (१)

आपण कुठून आलो? आफ्रिकेच्या दंतकथेनुसार माणसे मध्य आफ्रिकेतून आली. मानवी अस्तित्वापूर्वी येथे फक्त अंधार होता व सर्व पृथ्वी जलमय होती. बुबा नावाचा देव होता. एके दिवशी बुंबाचे पोट अचानकपणे दुखू लागले. वेदना थांबेनात. शेवटी त्याला उलट्या होऊ लागल्या. वांतीतून सूर्य बाहेर पडला. सूर्याच्या तापमानामुळे पाण्याचे वाफेत रूपांतर झाले. त्यामुळे जमिनीचा काही भाग दिसू लागला. तरीसुद्धा …

मानवी अस्तित्व (२)

मुळात हे विश्व अस्तित्वात का आहे? प्रसिद्ध विज्ञानकथालेखक डोग्लास एडम्स यांच्या मते या विश्वाचा आकार प्रचंड, अतिप्रचंड आहे. तरीसुद्धा महास्फोट सिद्धान्तानुसार (big bang theory) हिशोब केल्यास एके काळी हे विश्व आकाराने फारच लहान होते, असे म्हणता येईल. 1370 कोटी वर्षापूर्वी काळ व अवकाश शून्यातून बाहेर पडले, असा दावा हा सिद्धान्त करतो. हे कसे शक्य झाले? …

मानवी अस्तित्व (३)

आपण (बुद्धिमान सजीव) या विश्वात एकटेच आहोत का? निरभ्र आकाशाकडे रात्रीच्या वेळी पाहत असताना आपल्याकडेही कुणीतरी पाहत असतील असा भास होण्याची शक्यता आहे. लुकलुकणारे तारे कुणाचे तरी डोळे नसतील ना असे वाटण्याची शक्यता आहे. कदाचित त्या देदीप्यमान, विस्मयकारक ठिणग्यांमधूनच – ज्याला आपण चेतना म्हणतो त्यातूनच – आपल्या अस्तित्वाला आकार मिळाला असावा. आपले अंतर्मन मात्र या …

मानवी अस्तित्व (४)

गितामा हे विश्व फक्त आपल्यासाठीच आहे का? या प्रश्नाचे उत्तर कदाचित गोल्डिलॉक पॅराडॉक्समधून मिळू शकेल. अणूमधील परमाणूंना घट्ट धरून ठेवणारे सशक्त आण्विक बल जरूरीपेक्षा जास्त असते तर सूर्यासारख्या तळपत्या ताऱ्यातील हायड्रोजन वायू क्षणार्धात भस्मीभूत झाले असते. आपल्या माथ्यावर तळपणाऱ्या सूर्याचा स्फोट होऊन तुकडे तुकडे होत तो तारा नष्ट झाला असता व या पृथ्वीवर एकही जीव …

मानवी अस्तित्व (५)

मी होलोग्रामसदृश प्रतिमा असेन का? आपल्या अवतीभोवती असलेल्या वस्तूंकडे नजर टाकल्यास समोरची भिंत, बसलेली खुर्ची, बाहेरचे झाड, तुम्ही स्वत: हे सर्व खरेखुरे असून त्या अस्तित्वात आहेत याबद्दल तुमच्या मनात अजिबात शंका असणार नाही. परंतु जगातील या गोष्टी, तुम्ही आम्ही सर्व, व हे जग एखाद्या होलोग्राम आकृतीप्रमाणे त्रिमितीतील प्रतिमा तर नाहीत ना? काही तरी विचित्र विधान …

मानवी अस्तित्व (६)

माझ्यात जाणीव आली कुठून? आपण कालकुपीत बसून आपला जन्म होण्यापूर्वीच्या काळात जायचे ठरविल्यास आपण त्यावेळी कुठे होतो, हे सांगता येईल का? पुन्हा एकदा कालकुपीत बसून आपल्या मृत्यूनंतरच्या भविष्काळातील फेरफटका मारण्याचे ठरविल्यास आपण कुठे आहोत, हे तरी सांगता येईल का? स्पष्ट सांगायचे तर आपण कुठेही नाही. एके दिवशी आपल्या तुटपुंज्या आयुष्याची काही कारण नसताना सुरुवात होते …

मानवी अस्तित्व (७)

माणसात ‘स्वत्व’ (self) असे काही असते का? आपण जेव्हा झोपतो तेव्हा ती नाहीशी होते. जागे होतो तेव्हा परत आपोआप आलेली असते. काही वेळा स्वप्नात येते. काही वेळा स्वप्नच गायब झालेले असतात. हे शरीर माझेच आहे व मीच त्याचे नियंत्रण करत आहे याची जाणीव देणारे असे काही तरी आपल्यात असावे. त्यामुळे आपण आपली वेगळी ओळख पटवून …

मानवी अस्तित्व (८)

मी कुणाच्या तरी हुकुमाचा ताबेदार आहे का? आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनुरूप वागतो की आपल्याकडून कोणी हे करून घेते याबद्दल नेमके भाष्य करणे जवळजवळ अशक्य आहे. रेने देकार्त (१६४४) म्हणून एक तत्त्वज्ञ होऊन गेला. त्याने हे जग खरोखर आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. जग आहे का म्हटल्यावर त्यातील चराचर सृष्टी आहे का असाही प्रश्न …

मानवी अस्तित्व (९)

संगणक आपला ताबा घेतील का? आपला मेंदू म्हणजे एक अजब व विचित्र रसायन आहे. जगातील इतर कुठल्याही गुंतागुंतीच्या रचनेपेक्षा मेंदूची गुंतागुंत अनाकलनीय ठरत आहे. तरीसुद्धा आपण त्याला रक्त-मांस-चेतापेशी-मज्जारज्जू पासून तयार झालेले मशीन असेच म्हणू शकतो. म्हणजेच मेंदच्या कार्यप्रणालीप्रमाणे कार्य करू शकणारे मशीन आपणही बनवू शकतो असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांध्ये …

मानवी अस्तित्व (१०)

हुबेहूब माझ्यासारखा अजून कुणीतरी कुठेतरी असेल का? प्रचंड अंतरावरील एखाद्या दुसऱ्या दीर्घिकत आपल्यासारखीच एक आकाशगंगा आहे. त्या आकाशगंगेतसुद्धा आपल्या येथील सूर्यासारखा तारा आहे. या तारेपासून पृथ्वीसारखाच दिसणाऱ्या एका तिसऱ्या ग्रहावर तुच्यासारखाच दिसणारा अस्तित्वात आहे. तुच्यासारखाच तो जीवन जगत आहे. एवढे कशाला, तुम्ही आता जे वाचत आहात तेच तो तिथे वाचत आहे. अगदी तीच ओळसुद्धा…. आश्चर्याचा …

मानवी अस्तित्व (११)

माणूस प्राणी नामशेष होणार का? अमरत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या मानवाला मृत्यूच्या बरोबरच्या झोंबाझोंबीत अजूनही म्हणावे तसे यश मिळालेले नाही. उलट हा लढा माणसाला गोत्यात आणत आहे. परंतु आता आपल्याला वैयक्तिक मृत्यूबद्दलचा (स्वार्थी!) विचार करायचा नसून संपूर्ण मानववंशाच्या अस्तित्वाबद्दल काळजी करायची आहे. विशिष्ट दिवशी हा मानव वंश नामशेष होणार, मानवासकट जगातील समस्त प्राणिवंश नष्ट होणार, महाप्रलय येणार, …

मानवी अस्तित्व (१२)

आपल्या विश्वाच्या शेवटाची सुरुवात कशी असेल? मानवी अस्तित्वाच्या अंताबद्दल भाकीत करताना आपल्या विशाचा मृत्यूसुद्धा त्यास कारणीभूत ठरू शकेल असे म्हणावे लागते. हे विश कशाप्रकारे कोसळून जाईल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुळात यांची चाचणी कशी घ्यावी, त्यांची शहानिशा कशी करावी याबद्दलच अनेक शंकाकुशंका आहेत. उत्सुकता शमवण्यापोटीच हा मुद्दा उपस्थित केला जातो असेही वाटण्याची शक्यता …